(रत्नागिरी)
तालुक्यातील गावखडी भंडारवाडी येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास पूर्णगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल़ी. संतोष रामचंद्र कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावखडी भंडारवाडी येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार 13 जून 2023 रोजी रात्री 8 च्या सुमारास पूर्णगड पोलिसांकडून छापा टाकून कारवाई करण्यात आल़ी. यावेळी संशयित आरोपीच्या ताब्यात अवैध गावठी दारू आढळून आली, अशी तकार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानुसार संशयित संतोष कांबळे याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू प्रतिबंध कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा