(नवी दिल्ली)
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती एस कौल व न्यायमूर्ती अभय यांच्या खंडपीठाने या प्रकरणी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. कोर्ट म्हणाले – ‘हे कोर्टाचे काम आहे काय? आम्ही दंड ठोठावण्यास मजबूर होऊ अशा याचिकाच तुम्ही दाखल का करता?”’तुम्ही न्यायालयाचे दार ठोठावले, तर मग आम्ही कायद्याकडे दुर्लक्ष करावे का. कलम 32 अंतर्गत याचिका दाखल करण्यासाठी कुणाच्या मुलभूत अधिकारावर गदा आली आहे. तुम्ही लोक अशा याचिकाच का दाखल करता.’
सुप्रीम कोर्टात गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी करणारी याचिका एनजीओ गोवंश सेवा सदनने दाखल केली होती. याचिकाकर्त्याने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी केली होती.