(नवी दिल्ली)
अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाचा मोह कायम असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर केले गेले आहे. तर राहुल गांधींच्या यांच्या सर्व हातात सुत्रे गेली असल्याचे चित्र आहे. यामुळे राजस्थानातील काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्राथमिक टप्प्यावरच संकटात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी काल सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार होती. मात्र अजूनपर्यंत कोणाही अर्ज दाखल झालेला नाही. कॉंग्रेस राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे अध्यक्षपदाची निवडणूकही रोमांचक झाली आहे.
काँग्रेसच्या काही सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गहलोत यांच्यावर राहुल गांधी व सोनिया गांधीही नाराज आहेत. हायकमांडच्या इच्छेविरुद्ध अशोक गहलोत यांनी ८२आमदारांच्या राजीनाम्याचा घातलेला डाव गांधी कुटूंबाला आवडलेला नाही. अशावेळी काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नसून त्यांनी गहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे. इतकेच नाही तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्या नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, कमलनाथ आदि नेते अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नव्याने पुढे आले आहेत. इतकेच नव्हे तर दिग्विजय सिंह सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात असे बोलले जात आहे. तर राहुल गांधी यांच्या जवळचे व काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपालही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत येऊ शकतात. सध्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अध्यक्षपदासाठी कुणाला समर्थन द्यावे यासाठी विचार करीत आहेत. यापूर्वी अशोक गहलोत यांना समर्थन देणारे गांधी कुटुंब आता त्यांचेवर नाराज आहेत.