(रत्नागिरी)
गवत मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. ही घटना तालुक्यातील कुरतडे कातळवाडी येथे घडली. विकास सखाराम फुटक (40, ऱा कुरतडे कातळवाडी) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास फुटक यांनी 1 मार्च 2023 रोजी गवत मारण्याचे विष प्रश्न केल़े. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल केले होत़े. 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विकास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.