(रत्नागिरी)
देवरुख येथे आयोजित क्योरोगी स्पर्धेत 2 रा तर पुमसे स्पर्धेत 3 रा सांघिक क्रमांक मिळवत रत्नागिरी तालुक्याने घवघवीत यश संपादन केल आहे. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अँकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी मुंबई विभाग देवरूख यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरोगी आणि पुमसे स्पर्धा 2022-23 नुकतीच मराठा भवन येथे घेण्यात आली. दि. 20, 21, 22 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लबचे 15 खेळाडू सहभागी झाले होते.
क्योरोगी म्हणजे फाईट प्रकारात स्पेशल, सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर आणि सिनिअर अशा विविध गटात क्योरोगीमध्ये सुवर्णपदक सुरभी पाटील, केशर शेरे, स्मित किर, रुद्र जाधव, त्रिशा मयेकर, गायत्री शेलार यांनी मिळवले. तर क्योरोगीमध्ये रौप्य-पदक राधिका जाधव , गौरी विलणकर, प्रशांत मकवाना, प्रज्ञेश शेरे यांनी मिळवले तर क्योरोगीमध्ये कांस्य पदकाची कमाई आदया कवितके, तनिष्क कामतेकर, उर्वी कंळबंटे, स्वानंद तुपे, आधिराज कवितके यांनी केली.
सदर स्पर्धेत स्मित कीर सब-ज्युनिअर या वयोगटामध्ये बेस्ट फायटरचा किताब म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्व स्पर्धकांना प्रशांत मकवाना, रंजना मोंडुळा यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ उद्योजक श्री.किरण सामंत, तालुका संघटनेचे अध्यक्ष राम कररा, सचिव शाहरुख शेख, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, खजिनदार प्रशांत मकवाना तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे खजिनदार शशांक घडशी, क्लबचे उपाध्यक्ष अभिजित विलणकर, खजिनदार नेहा किर, सदस्य कनिष्का शेरे, साक्षी मयेकर, पुजा कवितके, भगवान गुरव यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन करत राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.