(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सालाबादप्रमाणे २७ सप्टेंबर २०२३ रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) यांचे द्वारे सन २०२३ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोष वाक्य (Theme) “Torusim & Grren Inveshment “पर्यटन आणि हरित गुंतवणूक” असे घोषित करण्यात आले. त्या अनुषंगाने दि. २५ सप्टेंबर २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालवधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत पर्यटन सप्ताह पर्यटक निवास गणपतीपुळे येथे साजरा करण्यात आला व पर्यटन सप्ताह मधील उर्वरित दोन दिवस बाकी आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी पर्यटक निवास गणपतीपुळे येथे वास्तव्यास असलेले पर्यटक, पोलीस अधिकारी तसेच स्थानिक रिक्षा चालक यांचे बांबू बुके देऊन स्वागत करण्यात आले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, स्थानिक व्यावसायिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच निवास कर्मचारी व स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या सहभागाने निवास परिसरामध्ये सकाळी ११.०० वा पर्यटन दिंडीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ५.०० वा पर्यटन आणि हरित गुंतवणूक या विषयावर एमटीडीसीचे निवृत्त अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी यांचे व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी उपस्थित स्थानिक सरपंच कल्पना पक्ये, महेश केदार, स्थानिक पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद केळकर, तसेच प्रसाद कुलकर्णी, स्थानिक पोलीस निरिक्षक क्रांती पाटील उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम व्यवस्थापकीय संचालक सौ. श्रद्धा जोशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैसवाल, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, रत्नागिरी संजय ढेकणे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली पार पडला
या कार्यक्रमाबाबतची माहिती गणपतीपुळे निवासाचे व्यवस्थापक वैभव पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला पर्यटक निवासाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.