(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जात असून या परिसरात एका चित्रपटाचे चित्रकिकरण होणार आहे. यामुळे गणपतीपुळे व परिसरातील ठिकाणांमध्ये सुमारे पाच दिवसाचे चित्रकिकरण होणार असल्यामुळे या परिसरातील निसर्ग सौंदर्य महत्त्व संस्कृती चालीरीती बोलीभाषा या आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. गणपतीपुळे परिसराला यामुळे आणखी प्रसिद्धी मिळून पर्यटनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे वक्तव्य मराठीअभिनेत्या प्रतिभा चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
‘रात्रीचा खेळ चाले ‘तसेच ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील अभिनेत्री प्रतिभा चव्हाण यांनी ‘रात्रीचा खेळ चाले’ या मालिकेत देविकाच्या आईची भूमिका साकारली होती. तसेच ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत ताईसाहेब ही भूमिका साकारली होती. दोन्ही मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका केल्यामुळे सर्वांच्या ही पात्रे लक्षात राहिली. तसेच प्रतिभा चव्हाण यांनी प्रतिभा प्रोडक्शनच्या माध्यमातून युट्युब वर छोट्या फिल्म माध्यमातून अभिनय करण्याची क्षमता आहे, अशा वंचित कलाकारांना घेऊन बनवल्या या फिल्म ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
गणपतीपुळे व परिसरामध्ये प्रतिभा चव्हाण निर्माता एका छोट्या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार असून गणपतीपुळे मंदिर व परिसरातील काही ठिकाणांचे या चित्रपटासाठी चित्रकीकरण होणार आहे. सुमारे पाच ते सहा दिवस या परिसरात चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटामध्ये एक नामांकित जोडी मुख्य भूमिकेत असून या परिसरातील कलाकारांना देखील या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी येथील ग्रामस्थ व पर्यटक व्यावसायिक कल्पेश सुर्वे यांच्याशी संपर्क साधावा असे प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले.
सदरचा चित्रपट हा जून जुलै च्या दरम्याने पूर्ण होऊन त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर गणपतीपुळे येथे नक्कीच पर्यटन आणखी वाढ होईल असे निर्माता अभिनेत्या प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले.