(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गडनरळ बौद्धजन ग्रामस्थ मंडळ व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.७ गडनरळतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या लुंबिनी बुद्ध विहाराचा भव्य उद्घाटन सोहळा गुरूवार दि.१८ मे रोजी सकाळी १० वा. भंते करुणानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धरूपाची स्थापना करून करण्यात येणार आहे.
यावेळी विहाराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व प्रसाद उर्फ बाबूशेठ पाटील व जमीन मालक धर्मदास सावंत हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मान्यवरांमध्ये बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, कोंकण विपश्यना सेंटरचे संचालक संतोष आयरे, जिल्हा समाज कल्याण समितीच्या माजी सभापती सौ. ऋतुजा जाधव , तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मेघना पाष्टे , बावीस खेडी संघटनेचे अध्यक्ष भाई जाधव, महिला अध्यक्षा सुकेशनी सावंत, विजय आयरे, सुहास कांबळे, भगवान जाधव, बौद्धजन ,पंचायत समितीचे कोषाध्यक्ष मंगेश सावंत, मुंबई शाखेचे अध्यक्ष मोहन सावंत, गडनरळ गावच्या सरपंच मानसी धनावडे, बावीस खेडी संघटनेचे सभापती नरजत पवार, क्रीडा शिक्षक राजेश जाधव, रत्नदीप कांबळे, सुरेश सावंत कमिटीचे अध्यक्ष विजय सावंत यांसह बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७ या शाखेचे विद्यमान पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण मंडळ, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
गडनरळ बौद्धजन पंचायत शाखेने मोठ्या भक्तिभावाने व जिद्दीने अतिशय मेहनतीने सुंदररित्या नवीन बांधण्यात आलेल्या लुंबिनी बुद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून मंगळवार दि. १६ मे रोजी भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा ही भरवण्यात आल्या आहेत. तसेच बुधवार दि.१७ मे रोजी सकाळी ९ वा. धम्म ध्वजारोहण, विविध स्पर्धा, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, स्नेहभोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची व बुद्ध रूपाची भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वा. स्नेहभोजन, तसेच रात्री १० वा.भीम बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरूवार दि. १८ मे रोजी सकाळी ९ वा. बुद्ध रूपाची भव्य मिरवणूक , सकाळी १० वा.बुद्ध विहाराचे उद्घाटन प्रसाद उर्फ बाबूशेठ पाटील तसेच जमीन मालक धर्मदास सावंत यांच्याहस्ते होईल.विहाराच्या नामफलकाचे अनावरण तालुकाध्यक्ष प्रकाश रा.पवार व संतोष आयरे यांच्या हस्ते होईल.सकाळी ११ वा. बुद्धरूपाची स्थापना भंते करुणा निधी यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापना कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तद्नंतर धार्मिक बुद्ध पूजापाठ, धम्मदेसना, दुपारी मान्यवरांची स्वागत व सत्कार, प्रमुख मान्यवरांचे मनोगत, स्नेहभोजन , तसेच महिलांचे विविध फनी गेम्स, रात्री ७ वाजता स्नेहभोजन ,रात्री ९ वा. मुलांचे सत्कार समारंभ व मार्गदर्शनपर सभा रात्री १० वा.बावीस खेडी संघटनेच्या कार्यक्षेत्रातील गाव शाखेतील मुलांचे सांस्कृतिक बहारदार रेकॉर्ड डान्स असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तरी या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील बौद्ध बांधवांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गडनरळ बौद्धजन पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे.