( मंडणगड / प्रतिनिधी )
मंडणगड तालुक्यातील उमरोली येथे डॉक्टरकडून अवघ्या दोन तासात घरी परतणार्या वृृध्दाचे घर फोडून 27 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद बाळाराम शेडगे (55, उमरोली, मंडणगड) यांनी बाणकोट पोलीस स्थानकात दिली. ही घटना 22 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्याने घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडगे हे 22 जुलै रोजी देव्हारे येथे खासगी डॉक्टरांकडे गेले होते. तेथे उपचार घेउन ते 12 वा. च्या दरम्याने घरी परतले. यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करुन पाहिले असता घरातील लोेखंडी कपाटातील चांदीचे पैंजण, बॅटरी, तसेच 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 27 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. शेडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.