(खेड / भरत निकम)
खोपी गोरेवाडीच्या जंगलमय भागात बाबू बाळाजी गोरे व त्याचा भाऊ रुपेश बाळाजी गोरे या दोघांच्या गावठी हातभट्टीच्या दारु धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकून ९४ हजार किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. हि घटना शनिवारी, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
खोपी गोरेवाडी येथील जंगलमय भागात गोरे बंधू यांच्या घराच्या पश्चिम दिशेला गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात होती. दारु गाळण्याची सगळी यंत्रणा तिथे या दोन्ही भावांनी तयार केली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन तपासणी केली असता, घराच्या शेजारीच जंगलात ५०० लीटर क्षमतेच्या ८ नग टाक्या आणि सर्व टाकीत गुळ, नवसागर मिश्रीत असलेले रसायन तसेच ७५० लीटर्स क्षमतेची लोखंडी टाकी असा एकूण ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संशयित बाबू गोरे व रुपेश गोरे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २८७ नुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे