(खेड / भरत निकम)
शहरातील महाडनाका शिवाजीनगर भागातील डॉ. पालेकर यांच्या खालिद हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या व पालेकर यांच्या मालकीच्या असलेल्या चाळीचा मागील काही भाग रविवार दि. 23 जुलै रोजी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पहाटेच्या वेळी कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चाळीतील उर्वरित भाग सुरक्षित आहे.
गेेले आठ दिवसापासून खेड शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. खेडमध्ये आजपर्यंत १४०२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ५७ मि. मी. पावसाची नोंद झालेली आहे. शनिवार पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील शिवाजीनगर भागातील डाॅ पालेकर यांच्या खालीद हाॅस्पीटलच्या पाठीमागे असलेल्या जीर्ण चाळीचा भाग कोसळला, सदर चाळ ही यापूर्वीच खाली करण्यात आली होती. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.