(चिपळूण /ओंकार रेळेकर)
खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आमदार राजन साळवी उपस्थित होते.
खेर्डी हे चिपळूण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, खेर्डी गावची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. खेर्डी हे उपशहर म्हणून ओळखले जाते. तसेच खेर्डीमध्ये औद्योगिक वसाहत आहे. परंतु येथील अग्निशम केंद्र बंद पडलेले आहे. गाव मोठ असल्याने अनेक प्रसंग घडत असतात. तसेच एम.आय.डी.सीमधील कंपन्यामध्ये देखील अनेक वेळा आग लागते. अशा वेळा जवळ अग्निशमन केंद्र नसल्यामुळे तसेच दुसरीकडून अग्निशमन येईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
खेर्डी गाव शहराकडे वाटचाल करत आहे तरी भविष्यात वाईट प्रसंग घडू नये. तसेच घडल्यास खेर्डी एम.आय.डी.सी. मध्येच पर्याय उपलब्ध असावा या हेतूने खेर्डी एम. आय. डी. सी. मध्ये अग्निशमन केंद्र असणे गरजेचे प्रस्ताव सादर आहे. तरी आपण तत्कालीन उद्योग मंत्री तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्रद्वारे मागणी केली होती. याचे उत्तर ७ एप्रिल २०२१ रोजी मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग यांनी आपल्याला खेर्डीमध्ये अग्निशमन केंद्र मंजूर झाल्याचे पत्र दिले होते. परंतू पुढे काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी लवकरात लवकर खेर्डी एम.आय.डी.सी. मध्ये बंद पडलेले अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी उमेश खताते यांनी केली आहे.