(खेड / इक्बाल जमादार)
खेड येथील रेल्वेस्थानकावरून सकाळी 10.00 सुमारास सुटणा-या खेड बोरीवली बसमध्ये महिला प्रवाशी चढत असताना, फिर्यादी महिलेच्या खांद्याला असलेल्या पर्सची चैन उघडून आतल्या कप्प्यात असलेले सोन्याचे मंगळसूत्र, 3 हार, 2 चैन, 4 जोड कानातले रिंगा, लेडिज अंगठी, सोन्याची कानगोष्टी व नथ असे एकुण 3 लाख 90 हजार 800 रूपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले. या प्रकरणी येथील पोलीसात गुन्हा रजिस्टर नंबर 146/2023 मध्ये भादवि 379 अन्वये येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाची फिर्याद सौ. अश्विनी आत्माराम शिबे (वय 50 मुळ रा. उधळे, शिबेवाडी ता. खेड जि. रत्नागिरी, सध्या रा. दहिसर-मुंबई ) यांनी येथील पोलीसात दाखल केली. या चोरीच्या गुन्ह्य़ाबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस कंट्रोल रूमकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फिर्यादी या आपल्या मुलीसोबत खेड बस स्थानकावरून शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10.00 सुमारास सुटणा-या खेड ते बोरीवली एस.टी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने संधी साधली. फिर्यादीत महिलेने आपल्या खांद्याला सदर पर्स लावली होती. या पर्सच्या आतील कप्प्यात वर नमुद वर्णनाचे व किंमतीचे दागिने फिर्यादीच्या संमत्तीविना लबाडीच्या इराद्याने चोरल्याप्रकरणी पोलीसांनी येथील पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.