(खेड)
खेड तालुक्यातील माणी-शेलारवाडी धरणाजवळील मुद्देमाल चोरल्यापकरणी येथील पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत महेश दिगंबर कांबळे यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
साहिल मनोहर कोरगांवकर (23, रा. लवेल), हरिकेश रामलाल सिंहमय (32, रा. उत्तरपदेश) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी एम.एच. 08/डब्ल्यु 8273 कमांकाच्या टेम्पोमधून मुद्देमाल चोरून नेत असताना ग्रामस्थांनी टेम्पो अडवला असता त्यामध्ये मुद्देमाल आढळला. हा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानुसार दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.