( खेड / इक्बाल जमादार)
मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी गावाजवळील आपेडे फाटा नजीक मुंबईहुन बदलापूर वरून रत्नागिरी येथे जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यानजीकच्या शेतात शिरली, त्यामध्ये ५ जण जखमी झाले. हा अपघात आज शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
या बाबत अधिक तपशील असा की, कार चालक तेजस मदन वगळ ( वय २७) हा आपल्या ताब्यातील कार (क्रमांक एम एच ०५ इएच ६०१३) गाडी बदलापूर येथून घेऊन रत्नागिरी येथे असता आपेडे फाटा नजीक त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कार थेट शेतात शिरली. यामध्ये कार चालक तेजस मदन याचेसह कारमधील अमोल गजानन शिवरकर ( ६५), अंकिता अमोल शिवलकर (५९), यश अमोल शिवलकर (२७) हे किरकोळ जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजधाम मोफत रुग्णवाहिकाचे चालक सुरज हंबीर यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून त्यांना तत्काळ कळबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.