(खेड / भरत निकम)
चिंचघर वेताळवाडी येथील दवबिंदू फार्महाऊसवर वेश्याव्यवसाय करणाऱ्या जोडगोळीला न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथील दवबिंदू फार्महाऊसवर रवींद्र गणपत गावडे (५०) व एका महीलेने आर्थिक अडचणीत असलेल्या मुलींजवळ ओळख करुन त्यांना देहविक्री करण्यासाठी परावृत्त केले होते. पिडीत मुलींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी फार्महाऊसवर ठेवून घेतले होते. याची माहिती मिळताच खेडच्या धडाकेबाज पोलीसांनी तात्काळ तेथे धाव घेतली आणि त्या दोघांना ताब्यात घेतले होते.
या जोडीला येथील न्यायालयासमोर हजर केले असता सुरुवातीला तीन दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडून वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.