(खेड)
खेड तालुक्यातील भरणे येथील एका हॉटेलच्या मागे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 1350 रूपये किंमतीची 19 लिटर गावठी दारू जप्त केली.
याप्रकरणी आनंद गंगाराम झोरे (सनघर- धनगरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे अवैधरित्या गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून आनंद झोरे याच्याकडून गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.