(खेड/ प्रतिनिधी)
खेड शहरातील महाडनाका येथे होंडा एक्टिव्हा पांढ-या रंगाच्या दुचाकीमधुन विदेशी दारुची अवैध व बेकायदेशीर विक्री आणि स्वत:च्या कब्जात मिळुन आल्याप्रकरणी योगीराज दयानंद वायंगणकर, सतीश रघुनाथ मोहिते या दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा येथील पोलीसात गुन्हा रजिस्टर नंबर 268/2023 मध्ये दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार दि.7/9/2024 रोजी दुपारी 11.30 वाजता घडली. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणाची फिर्याद संपत मच्छिंद्र गिते पोलीस काॅस्टेबल खेड पोलीस स्टेशन यांनी येथील पोलीसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शहरातील महाड नाका अशा गजबजलेल्या ठिकाणी अवैध व बेकायदेशीर विदेशी दारुची विक्री हेत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. त्याप्रमाणे फिर्यादी पोलीस काॅस्टेबल संपत मच्छिंद्र गिते हे घटनास्थळी दाखल शोध घेता, पांढ-या रंगाची होंडाची ॲक्टििव्हा दुचाकी नंबर एमएच 08 AU 0970 च्या डिकीमध्ये विदेशी दारूची विक्री करताना वर नमुद संशयीत दोन आरोपीत इसमांना पोलीसांनी दुचाकीसह 50,000/- रु. किंमतीची पांंढ-या रंगाची ॲक्टिव्हा, 14,400/- रु. किंमतीची विदेशी दारु असा एकुण 64,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये येथील पोलीसात वर नमुद संशयीत दोन आरोपीत यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.