(खेड)
खेड तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा व राष्ट्रीय क्रीडा दिन तालुका क्रीडा संकुलामध्ये उत्साहात संपन्न झाला.
या शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या असून आज तिसऱ्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष व खेड तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश चिकणे व खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कुंदन सातपुते यांची उपस्थिती लाभली. या सर्वांचे स्वागत खेड तालुका समन्वयक व खेड तालुका शारिरीक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष संतोष शिर्के यांनी केले.
यावेळी उपस्थित तालुका समन्वयक बापू मोरे, संदीप भास्कर, कृणाल चव्हाण, अजय निगडेकर, श्री. मेजर मोरे, श्री. वानखेडे, सुशांत पाटील, रसिका पालांडे, निगडेकर मॅडम, श्रेयस चाळके तसेच १४ व १७ वर्षाखालील विद्यार्थी खेळाडू होते. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा खेळाचे महत्त्व सांगितले. सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.