(खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर माध्यमिक विभाग व कै. राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर उच्च माध्यमिक विभाग भडगाव या प्रशालेचे मुख्याद्यापक राजकुमार मगदूम यांना बेस्ट इंटरनॅशनल मुख्याद्यापक अवॉर्ड जाहीर झाला आहे. मगदूम यांना बेस्ट इंटरनॅशनल मुख्याध्यापक अवॉर्ड मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री.माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, दिपक लढ्ढा, पेराज जोयसर, विनोद बेंडखळे, अनिल शिवदे, डाॅ. रमणलाल तलाठी, आप्पा पाटणे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उमेशकुमार बागल, आदि पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
SOF OLYMPIAD परिक्षेसाठी संपूर्ण जगभरातून ४८ देशातून ६८००० स्पर्धकांमधून केवळ २० यशस्वी निवडक मुख्याद्यापकांमध्ये खेड तालुक्यातील ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव चे मुख्याद्यापक राजकुमार मगदूम यांना “SOF BEST INTERNATIONAL PRINCIPAL AWARD” या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामुळे खेड तालुक्यातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्याध्यापक श्री. राजकुमार मगदूम यांचे संस्था व प्रशाला व्यवस्थापनाचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.