(संगलट / इक्बाल जमादार)
संविधानिक आणि सामाजिक कार्यामुळे खेड तालुक्यातील मुंबके गावचे आमिर काझी याची क्रांतीरत्न पुरस्कारासाठी निवड होऊन संविधान दिनी ठाण्यामध्ये आयोजित संविधान महोत्सव या कार्यक्रमात क्रांतीसूर्य संघटनेच्यावतीने त्यांना क्रांतीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या आठ वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आमिर काझी सक्रिय आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटनेचा महाराष्ट्र सहसचिव म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, विद्याथ्यर्थ्यांच्या हक्कासाठी कार्य करत आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षापासून संविधान रेल्वेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार व्हावा म्हणून संविधान रेल डब्बा ही संकल्पना सुरू केली.
गेल्या दहा वर्षापासून क्रांतीसूर्य संघटना ही महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लोकांना क्रांती रत्न या पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी संविधानिक व सामाजिक कार्याचा अभ्यास करून युवांना प्रेरित करण्यासाठी आमीर
काझी यांना क्रांतीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर खारीपट्ट्यातून परिसरातून अभिनंदनाचा करण्यात येत आहे.