[ खेड ]
वरातीमध्ये जमावाने काठीने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह चार जण जखमी झाल्याचा प्रकार तालुक्यातील कुरवळ जावळी आखाडेवाडी येथे मंगळवारी घडला. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव काशिनाथ उतेकर, सूरज सुरेश उतेकर, अविनाश कृष्णा बामणे, सिद्धेश एकनाथ उतेकर, प्रथमेश प्रमोद उतेकर, प्रणय प्रमोद उतेकर, ओंकार संतोष उतेकर, प्रमोद तुकाराम उतेकर, नीलेश देवजी उतेकर, अमोल दिलीप सावंत, अमित दिलीप सावंत (सर्व रा. कुरवळ जावळी आखाडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. गावातील दीपक उतेकर यांच्या लग्नाची वरात मंगळवारी निघाली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयितांनी वरातीवर हल्ला केला. यामध्ये शीतल उतेकर या महिलेच्या कानातील कर्णफुले जमिनीवर पडली. तसेच अंकुश मोरे यांच्या गाडीचे नुकसान झाले. या मारहाणीमध्ये समीर चंद्रकांत उतेकर, शिवाजी चंद्रकांत उतेकर, शीतल शिवाजी उतेकर, सुरेश गणपत उतेकर, बाबाजी शंकर उतेकर (सर्व रा. कोरबळ जावळी आखाडेवाडी) हे पाचजण जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.