(खेड / प्रतिनिधी)
रेल्वेच्या धडकेने खेड तालुक्यातील उधळे येथील 25 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय म्हादलेकर असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत तुतारी एक्सप्रेसच्या लोकोपायलटने कळंबणी रेल्वेस्थानकात खबर दिली. त्यानुसार पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.