(संगलट-खेड/इक्बाल जमादार )
खेड शहरातील तिनबत्ती नाका येथील तळ्याचे वाकणार येथे बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावून खेळला जात असल्याची माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.10 वाजताच्या सुमारास मटका जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली. यावेळी 700/- रोख रक्कम व जगार/मटका खेळण्याचे साहीत्यासह संशयीत आरोपीत सिध्देश सुरेश माळी (वय 30 रा. कुवारसाई खेड शहर) याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 274/2022 मध्ये महाजुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाची फिर्याद मपोह अस्मिता अमित साळवी यांनी येथील पोलीसात दाखल केली. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
तसेच खेड स्टॅन्डपासून पाच पावलाच्या अंतरावर बडे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा असून या ठिकाणी रात्र दिवस जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याबाबत चर्चा आहे. त्यावरही कारवाई होणे अपेक्षित असल्याचे येथील नागरिकांतून बोलले जात आहे. ज्या दरबारावर अनेक महत्वाचे लोक देखील हजेरी लावताना दिसत आहेत यावर कधी कारवाई होणार? असा प्रश्न खेडवासियाना पडला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असून महिलांचे व विद्यार्थी यांचे शाळेत जाण्याच्या मार्गावर असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याला एक मोठे प्रख्यात हायस्कूल असून देखील असे प्रकार सुरू आहेत. तसेच खेड बाजारपेठेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मटका जुगार सुरू असल्याचे बोलले जाते. यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी मागणी आता केली आहे