(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील धामणदेवी-मळेवाडी येथील जंगलमय भागात बेकायेदशीरपणे जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबू राठोड (52 पालपेणे-गुहागर), विनोद विष्णू केरवकर (44 पालपेणे-गुहागर), अशिष दीपक सकपाळ (37 गोवळकोट- चिपळूण), बाजीराव शिवाजी पवार (46 पेढे चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जंगलमय भागात बेकायदेशीरपणे जुगारावर पैसे लावून खेळ सुरू असल्याची माहिती मिळता पथकासह धाड टाकत तिघांना रंगेहाथ पकडले.