(इक्बाल जमादार/खेड)
खेडमधील कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव शाळेचा विद्यार्थी केदार भावे याला शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट पुरस्कार प्राप्त झाला आहे. केदार याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला.
केदार हा खेड-ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड या शैक्षणिक संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. बारावी वाणिज्य मध्ये शिकत आहे. त्याला शैक्षणिक वर्ष 2018 -19 चा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईड यांच्यातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.. केदारला संतोष भोसले, महादेव वाघमोडे, शांतीलाल आव्हाड या स्काऊट मास्टरांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष, माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.