(रत्नागिरी)
रत्नागिरी मधील गोळप गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमला पालकमंत्री उदयजी सामंत गेले असता, त्या ठिकाणी गोळप मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी पालकमंत्री यांचे दिमाखात स्वागत केले.
त्यानंतर पालकमंत्री कार्यक्रमांच्या व्यासपीठावर निघाले असता त्यांनी स्टेजची बैठक व्यवस्था पाहिली. पालकमंत्री यांना वेगळी खुर्ची आणि इतरांना वेगळ्या असलेल्या खुर्च्या त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी ती खुर्ची स्वतः बाजूला केली आणि इतरांना लावलेल्या समान खुर्चीत ते बसले. यातून रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे विचार, वागणुकीबाबत उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा झाली. मी खुर्चीचा पुजारी नसून समतेचा आणि मानवतेचा पुजारी असल्याचे दर्शन त्यांनी गोळपच्या कार्यक्रमात प्रत्यक्षात दाखवून दिले.