(जाकादेवी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी मुख्य बाजारपेठच्या दरम्यान गारवा हॉटेल ते सात पायरी परिसरात मोक्याच्या तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जाकादेवी खालगाव परिसरातील ग्रामस्थ व व्यापारी यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तसेच अनुचित प्रकार घडल्यास गुन्ह्यांची उकल होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत खालगाव, ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी आणि जाकादेवी व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून खालगाव जाकादेवी बाजारपेठ परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आला आहे.
या परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, व्यापारी यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त आणि दिलासा देणारे ठरले आहेत. विशेषतः जाकादेवी बाजारपेठ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जाकादेवी बाजारपेठेत व्यापारी, नागरिक, ग्रामस्थ यांची वस्ती मोठी आहे. या बाजारपेठेसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने खालगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी आणि व्यापारी संघटना जाकादेवी यांच्या माध्यमातून हे सीसीटीव्ही कॅमेरे परिसरामध्ये बसवण्यात आले आहेत. सुरक्षितता आणि अनुचित प्रकार घडल्यास या गुन्ह्यांची उकल होण्याच्या दृष्टीन हे सीसीटीव्ही कॅमेरे हे फारच फायदेशीर ठरणार आहे.
सदर सीसीटीव्ही कॅमेरेच्या उद्घाटनाप्रसंगी गावचे धडाडीचे व उपक्रमशील सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, खालगावचे माजी सरपंच प्रकाश गोताड, ग्रामपंचायत सदस्य तेजस्वी कुल्ये, उमा देसाई, प्रिया महाडिक, श्रद्धा रामगडे, चंद्रकांत जाधव, विनया गोताड, दिपक कातकर, व्यापारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत मुळ्ये, अमित कोळवणकर, प्रसन्न खेडेकर, नाना महाडिक यांसह परिसरातील व्यापारी ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीसीटीव्ही कॅमेरे खालगाव जाकादेवी परिसरात बसवण्यात मोलाचे योगदान देणारी खालगाव ग्रामपंचायत, ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी आणि जाकादेवी व्यापारी संघटना यांना खालगाव-जाकादेवी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी मनापासून धन्यवाद दिले.