(रत्नागिरी)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी ही पतसंस्था स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून साँफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक व्यवहार,एस एम एस सुविधा व १००% सायबर सेक्युरिटी असणारी संस्था म्हणून नावारूपाला आली. आर्थिक निकष प्रमाणबध्द राखत, पारदर्शक व्यवहार व विनम्र सेवा देताना चार वर्षातच संस्थेला सहकार खात्याकडून पाच शाखांना मंजूरी मिळाली. संस्थेचे व्यवहार गतीमान करण्याच्या दृष्टीने व ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने शृंगारतळी येथील शाखेचे उद्घाटन करताना एनईएफटी, आरटीजीएस, क्यूआर कोड या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचेचा शुभारंभ श्रीमती हेमलता श.गुहागरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या या पतसंस्थेने उत्तुंग भरारी घेत ग्राहकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर सुरू केल्याने ग्राहक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या परिपूर्ण करणे ही काळाची गरज ओळखून संस्था त्यादृष्टीने मार्गक्रमण करीत असून लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा देण्याचा मानस असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत असे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगून लवकरच दाभोळ, खंडाळा, पालशेत व पूर्णगड शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होतील यासाठीचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था अधिक मजबूत कशी होईल याकडे सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी व समन्वय समिती पदाधिकारी मेहनत घेत आहेत.