( खेड / प्रतिनिधी )
शासकीय कामात अडथळा व खंडणी मागितल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांवर दाखल गुन्ह्या प्रकरणी ५ जणांना येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. याबाबत येथील भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक सायली वसंत धोत्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चंद्रकांत तांबे, प्रदीप कांबळे, प्रणेश मोरे, यासीन परकार, शोएब खत्री (कोडिवली) यांच्यासह अन्य ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कार्यालयात सहकारी शिवांनद टोम्पे यांच्यासह कर्तव्य पार पाडत असताना कार्यालयाच्या अभिलेख कक्षात अनधिकृतपणे प्रवेश करत चुकीच्या पद्धतीने कोंडिवली येथील जमिनीची मोजणी केली असे त्यांच्यासह सहकारी शिवानंद टोम्पे यांना शिवीगाळ व दमदाटी करत धमकी दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. हा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.