(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
गुहागर तालुका क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते शृंगारतळी येथील मैदानावर पार पडले. माजी. जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम तसेच स्टार अभिनेता पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळी तसेच जेष्ठ पत्रकार सतीश कदम, डॉ. प्रकाश शिर्के, भगवान कदम,अँड. संकेत साळवी, अमिष कदम, बाबा कदम, निखिल साळवी, सुभाष जाधव, सुयोग विचारे, अजय खाडे, मंगेश कदम, विक्रम कदम, मंगेश जोशी, शैलेश पवार, सरपंच मीनल जोशी, चिखलीच्या सरपंच मानसी कदम तसेच दिवसभरामध्ये चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, पाटपन्हाळ्याचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्ले मुन्ना देसाई तसेच समाजातील प्रमुख मान्यवरांनी यावेळी व्यासपीठावरती हजेरी लावली होती यांसह सर्व संघ मालक व इतर सर्व स्पर्धा आयोजन उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी आमदार भास्कर जाधव यांना मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वाजत गाजत व “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देत व्यासपीठापर्यंत आणण्यात आले. सर्वप्रथम स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
मात्र अलीकडे मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी टाहो फोडत आहे. लोकशाही मार्गाने तो संघर्ष करीत आहे. अशावेळी आम्ही त्यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी तयार आहोत आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या तरुणांना मी सांगतो की, लोकशाही मार्गाने संघर्ष करून आपण स्वतःला सिद्ध करावे व आपली उन्नती करावी, असे आवाहन आहे केले. माझ्या राजकीय आयुष्यात किंवा निवडणुका लढवताना मी समाज म्हणून कधीच मते मागितली नाही. सर्व समाजाला एकत्र ठेवून मी राजकीय वाटचाल ठेवली आहे. आ.जाधव यांनी स्पर्धा आयोजक व समाजाच्या तरुणांना यापुढेही असेच एकत्र राहण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेमध्ये एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाला सिनेस्टार अभिनेता पंढरीनाथ कांबळी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. दिवसभरामध्ये एकूण 12 सामने खेळविण्यात आले.