(रत्नागिरी)
दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘विथ आर्या’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या रत्नागिरीतील ‘विथ आर्या’ या संस्थेतर्फे २०२० पासून “दोन घास” हा उपक्रम अतंर्गत शासकीय रुग्णालयात सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय शहरातील मिरजोळे इतर वाड्यामधून अनेक गरजू कुटुंबातील नागरिक या संस्थेला जुळलेले आहेत. रत्नागिरीतील व्यवसायिक हर्षद भाटकर रिया भाटकर आणि ऋषिकेश भाटकर, पूनम भाटकर यांच्या पुढाकाराने “विथ आर्या” या संस्थेचा “दोन घास” हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील रूग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना भाटकर कुटुंबीयांचा उपक्रम लाभदायक ठरत आहे.
दोन घास ‘विथ आर्या’ संस्थेचे असे चालते कार्य
विथ आर्या हा सेवाभावी व्यवसायिक भाटकर कुटुंबीयांचा समूह आहे. विथ आर्या संस्थेची स्थापना शीतल भाटकर व विक्रांत भाटकर यांनी केली. यामध्ये रत्नागिरी येथील भाटकर कुटुंबीय निःस्वार्थ सेवा देण्याच्या हेतूने एकत्रित आले. या कुटुंबाला कुणाचाच चेहरा नाही. ‘व्यक्ती मोठी होण्यापेक्षा कार्य मोठे व्हावे,’ या हेतूने भाटकर कुटुंबासह एकूण ७ जण कार्य करीत आहेत. समूहातील सदस्यांच्या दातृत्वावरच ‘विथ आर्या’ची सेवा अखंडित सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दररोज सकाळी ८० जणांचा नाष्टा आणि दुपारी ७० अन्नाची पॅकेट व सायंकाळी ७० अन्नाची पॅकेट मोफत दिले जाते. म्हणेजच, दरदिवशी २१० रूग्णांना विथ आर्या संस्थेकडून ‘दोन घास’ या उपक्रमा अंतर्गत अन्न विनामूल्य वितरीत केले जाते. तसेच मुंबईतील KEM रूग्णालयात ही एक टीम संस्थेची कार्यरत आहे. या संस्थेचे कार्य निश्चितपणे वाखण्याजोगे आहे. शहरातील काही गरीब गरजू नागरिक नियमित सकाळ संध्याकाळ जेवण घेण्यासाठी येत असतात. दोन वर्षापूर्वी सुरू केलेला उपक्रम खंडित न होऊ देता नियमित सुरू ठेवत भाटकर कुटुंबीयांनी पुढे केलेले दोन घास गरीब-गरजू भुकेलेल्यांना तसेच रुग्णालयातील रूग्णांना आज जीवनदान देणारे ठरत आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये भाटकर कुटुंबीय होते रुग्णसेवेत व्यस्त
कोरोना विषाणूच्या संसर्गाने सुरू झालेल्या लॉकडाउनमध्येही विथ आर्या संस्थेचे शीतल भाटकर, विक्रांत भाटकर, हर्षद भाटकर, रिया भाटकर, ऋषिकेश भाटकर, पूनम भाटकर हे सतत कार्यरत होते. चक्री वादळा सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या ही काळात रुग्णांच्या सेवेसाठी भाटकर कुटुंबीयांची तत्परता तितकीच होती. रुग्णांसाठी तसेच भुकेल्या व्यक्तींच्या पोटात दोन घास पडावेत, यासाठीच्या कामात या कुटुंबाने स्वत:ला झोकून दिले आहे. विशेष म्हणजे भाटकर कुटुंब करत असलेल्या रुग्णसेवेची आजपर्यंत त्यांनी कोणत्याही ठिकाणी जाहिरातबाजी केलेली नाही. ना कोणती पेपरबाजी केलेली. आजपर्यंत १ लाख ४७ हजार रूग्णांना मोफत अन्न वितरित करण्यात आले आहे.
संस्थेच्या रिया भाटकर म्हणाल्या की, सप्टेंबर २०२० पासून दोन घास विथ आर्या हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. स्वयंपाकाची जबाबदारी आम्ही साथ माणसे मिळून उचलत असतो. चपाती लाटणे, भाज्या निवडणे अशी पडेल ती कामे कुटुंबातील सदस्य करत असतात. हर्षद भाटकर आणि ऋषकेश भाटकर सकाळ, सायंकाळीं शिजवलेले अन्न व्यवस्थित पोहोच होते की नाही याचे नियोजन स्वतः ते उपस्थीत राहून करत असतात. मी आणि पूनम भाटकर स्वयंपाक घरात लागणाऱ्या साहित्याची तजवीज करतो. प्रत्येकाला सकस आहार मिळावा याची खबरदारी घेत असतो. या उपक्रमात एकूण आम्ही सातजण काम करत आहोत. यापुढे त्या म्हणाल्या, प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी. वेगवेगळ्या परीस्थितीत अनेकजण उपाशीपोटी झोपत असतात. त्यांच्यासाठी काही करावे ह्या भावनेतून गरजूंच्या पोटात दोन घास जावे, कोणी उपाशी राहू नये. यासाठीच आम्ही उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.
या रूग्णालयात अनेक गरजू, सर्वसामान्य लोक उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे अन्नविना हाल होतात. हे माझ्या सारख्या व्यवसाय करणाऱ्या माणसाला पाहत नाही. जेवणाची गाडी आली की जेवणासाठी रांग लागते हे पाहून खूप दुःख होते. परंतु शक्य होईल तितके करण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न आहे. वर्षाचे ३६५ दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ रुग्णांसाठी तसेच गरजू व्यक्तींसाठी अन्न विनामूल्य वितरीत करत आहोत. कोरोनाच्या काळात हा उपक्रम राबवून २ वर्ष होत आहेत. ज्या गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू लागतात त्या ही आम्ही देत असतो. परंतु एकाही मीडियाने या उपक्रमाची दखल घेतली नाही. अशी खंत हर्षल भाटकर यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, या उपक्रमासाठी आर्थिक मदत जिल्हा वासियांनी केली पाहिजे असे वेळोवेळी वाटत असते परंतु जिल्ह्यातून कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. यापुढे तरी रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक, छोटे-मोठे व्यवसायिक, शासकीय कर्मचारी शक्य होईल तेवढी नियमित मदत करतील आणि आमच्या उपक्रमाला आणखी बळ देतील, असा विश्वास ही भाटकर यांनी व्यक्त केला.
दोन घास विथ आर्या या उपक्रमांसाठी ज्यांना कोणत्याही प्रकारची निस्वार्थीपणे मदत करायची असेल त्यांनी हर्षद भाटकर 89998 34342 किंवा ऋषिकेश भाटकर 9699347793 या क्रमांकांवर संपर्क करून मदत करावी. असे आवाहन ही यावेळी हर्षद भाटकर यांनी केले आहे.
त्यांच्या या उत्तम कामगिरीबद्दल भाटकर कुटुंबियांना रत्नागिरी 24 न्यूज चा सलाम !