संपूर्ण जगच आज कोरोनाच्या विळख्यात आहे. सारे मिळून कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करतायत. चिपळूण तालुक्यातही कोरोनाविरुद्ध ही लढाई सुरू आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शासकीय, राजकीय संघटना, प्रशासन हातात हात घालून एकत्रित लढा देत आहेत. सामाजिक बांधलकीच्या जाणिवेतून कै.शिवाजी अण्णा पाटील यांच्या विचारधारेनं चालणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनासुद्धा या कार्यात सहभागी आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक संघ चिपळूणच्या पुढाकाराने विस्टआँन व रियल लाईफ रियल पिपल या पुण्यातील संस्थांकडून प्राप्त झालेले पीपीई किट्स, आँक्सिमिटर, थर्मल गन, सँनिटायझर, मास्क, औषधे इ.सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य तालुका आरोग्य यंत्रणेकडे सुपुर्द करुन खारीचा वाटा उचलला आहे.
छोटेखानी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष श्री. प्रकाश गांधी यांनी आमदार निकम करीत असलेले अलौकीक कार्य आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व प्रशासन घटक यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून आरोग्य यंत्रणेने सुचविल्याप्रमाणे पुण्यातील दोन समाजसेवी संस्थांच्या सहकार्यातून शिक्षक संघाला समाजसेवेची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. तसेच आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाप्रमाणे सदरचे साहित्य तालुक्यातील कोविड सेंटर्स तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करणेत येणार आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेचेही आभार मानले.
आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत सदरचे साहित्य तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती ज्योती यादव यांच्याकडे संघटनेने सुपुर्द केले. यावेळी चिपळूण पंचायत समिती सभापती श्रीमती रिया कांबळे, प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार मा.जयराजजी सुर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रविणजी राऊत, गटशिक्षणाधिकारी मा.डी.डी.ईरनाक, संघटनेचे नेते सेवानिवृत्त शिक्षक विलासजी गुजर, जिल्हा सरचिटणीस मा.दीपकजी मोने आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणेस्थित विस्टआँन आणि रियल लाईफ रियल पिपल या संस्था व शिक्षक संघ यांच्यातील दुवा आणि शिक्षक संघ तालुका अपंग सेलचे पदाधिकारी श्री. राजीव शिंदे यांच्या कार्यकुशलतेमुळे एवढा मोठा सहयोग देता आला.या बद्दल श्री. शिंदे यांच्या सेवाकार्याचा गौरव प्रांताधिकारी मा.प्रविणजी पवार यांनी केले. तसेच जगभरातील सुमारे ४० देशांत दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेशी चिपळुणच्या प्राथमिक शिक्षक संघाशी दृढ असलेल्या नात्याचे आमदार शेखर निकम यांनी कौतुक केले आणि सेवाकार्यातील सहभागाबद्दल चिपळूण तालुक्यातील जनतेच्यावतीने धन्यवाद दिले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक मोने सरांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सचिव श्री. विनायक गुरव, सर्वश्री फिरोज खान, बळीराम पाणिंद्रे, कृष्णदास डिके, कृष्णाजी कोकमकर, राम रहाटे, संभाजी चव्हाण, तुळशीराम धापसे, दीपक खाडे, सुनील उभळेकर, विश्वास पाटगावकर, किरण गोखले, देवराव शिसोदे, युगेश कदम, दिनेश लांजेकर, अशोक गोरिवले, विजय शिंदे, दीपक कांबळे आदी शिक्षक बंधुनी बहुमोल योगदान दिले.