(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जि..प. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कोळीसरे नं-१ येथे विसावा प्रतिष्ठान खंडाळा येथील उद्योजक श्री.राजू केदारी व उद्योजक श्री.राकेश केदारी आणि परिवाराकडून इ. पहिली ते सातवीच्या गरजवंत सर्व विद्यार्थांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्री.जोशी, सहाय्यक शिक्षक श्री. लोगडे, श्री.कोवळे,स्वयंसेवक श्री. सागवेकर,शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष श्री. रमेश गोताड,उपाध्यक्ष श्री. शिवप्रसाद लिंगायत,माजी सरपंच व शिक्षणतज्ञ राजेंद्र गोताड,गणेश लिंगायत,सौ.लिंगायत व विद्यार्थी उपस्थित होते. या स्तुत्य शैक्षणिक देणगीबद्दल श्री.राजेद्र गोताड यांनी विसावा प्रतिष्ठान खंडाळा यांचे कौतुक करुन आभार मानले. कृतज्ञता व्यक्त केली.