(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे, सोनगिरी, कुरधुंडा, डिंगणी, फुणगुस परिसरातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन कट केले. यामुळे ग्रामस्थ गेले 10-12 दिवस अंधारातून प्रवास करत आहे. प्रशासनाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
दलित वस्ती, मोहल्ला, अंबेड बु. गावाकडे, वाडी वस्तीवरील रस्त्यावर लावण्यात आलेले स्ट्रीट वीजबिल न भरल्यामुळे बंद ग्रामस्थांना अंधारात चाचपडत प्रवास करावा लागत आहे. ग्रामपंचायतीला याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत देवरूख पंचायत समितीकडे बोट दाखवत आहे. पंचायत समिती मात्र बिल भरण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे वीज कनेक्शन महावितरण कडून कट करण्यात आले आहे. मागील बिल हे ग्रामपंचायतींनी भरले होते, मात्र आता पंचायत समितीने बिल भरणे आवश्यक असताना पंचायत समिती अधिकारी जिल्हा परिषदेकडे बोट दाखवत आहेत.
स्ट्रीट लाईट बंदमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी जंगलातून बिबट्याचा कायम वावर असल्याने रस्त्याने जाताना भीतीने गाळण उडत आहे. बंद स्ट्रीट लाईटबाबत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी चौकशी केली असता पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे बोट दाखवले जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गेली 10 दिवस या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पंचायत समितीने वेळीच लक्ष घालून याकडे लक्ष द्यावे अन्यथा ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे.