( रत्नागिरी )
रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी काम करीत असताना साखरपा, कोंडगाव परिसरात ठेकेदार रवी इन्फ्रा या कंपनीने वळण रस्ते काढताना योग्य ती उपाययोजना केलेली नसल्याने या परिसरात चिखल मोठ्या प्रमाणात रस्तावर आल्याने छोट्या दुचाकी वाहनांना,रिक्षा ही वाहणे चालविताना कसरत करावी लागत असल्याने ते व्यावसायिक हैराण झालेले आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी संबधित रवी इन्फ्रा कंपनीची असूनही ही कंपनी लक्ष्य देत नाही आहे. सध्या दररोज पाऊस पडत असल्याने स्थानिक वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी कंपनीने लक्ष घालून होणाऱ्या त्रासावर मोठा अपघात होण्याच्या अगोदर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे परंतू यावर रवी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गांभीर्यपूर्वक लक्ष्य देत नसल्याने याबाबत प्रशासनाला कळवून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी साखरपा ग्रामपंचायतच्यावतीने संगमेश्वर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच सौ रुचिता जाधव तसेच उपसरपंच ओंकार कोलते उपस्थित होते. याबाबत ग्रा.पं. ने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले आहे.