(मुंबई)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. कोरोना काळातही प्रत्येक टेंडरमागे आदित्य ठाकरेंनी १५ टक्के घेतले असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री राणे यांनी यावेळी केला
नारायण राणे यांनी घेतलेल्या प्रेस दरम्यान मांडलेले महत्वाचे मुद्दे
- कुणाला एखाद्या विषयावर मोर्चा काढायचा असल्यास त्यांना विरोध कसं करणार? लोकशाहीत असं होत नाही. ज्यांना कामधंदा नाही ते मोर्चाच काढणार, शिव्याच देणार. महाविकास आघाडीनं आज ठाण्यात काढलेल्या मोर्चाची नारायण राणेंनी खिल्ली उडवली.
- उद्धव ठाकरे यांनी यापुढं एखादी सभा घेतली आणि त्यातील भाषणामुळं काही वाईट प्रकार घडला, तर त्यांना परिणाम त्याचे भोगावे लागतील.
- उद्धव ठाकरे कुणाचंही भलं करू शकत नाही. घुसून मारण्याची भाषा त्यानं करू नये. मातोश्री सुरक्षित आहे का? तुम्हाला मातोश्रीचे दरवाजे तरी माहीत आहेत का?
- बाळासाहेबांनी त्यांच्या कर्तृत्वानं उद्धव ठाकरेंना सुरक्षित करून ठेवलं. पण उद्धव ठाकरेंनी आदित्यला असुरक्षित केलंय. सगळ्यांशी दुश्मनी करून ठेवलीय.
- उद्धव ठाकरे यांची मातोश्री १ आणि मातोश्री २ अधिकृत आहे का? आमचे अधिकारी ते तपासतीलच.
- गुंडगिरी मोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. उद्धव ठाकरेंनी त्याची चिंता करू नये. त्यांनी मातोश्री १ आणि मातोश्री २ ची चिंता करावी
- मोले घातले रडाया… अशी उद्धव ठाकरेंची गत आहे. असा माणूस जन्माला येईल हे बहुतेक त्यावेळी तुकाराम महाराजांना कळलं असेल. म्हणून त्यांनी या ओळी लिहून ठेवल्या असतील
- उद्धव ठाकरेंच्या यापुढच्या भाषणाला पत्रकारांंनी जाऊ नये. मुंबईतच राहावं. तेच ते बोलत असतात
- भाजपच्या कार्यकर्त्यांना यापुढं वाकडंतिकडं बोललात तर फडतूस काय असतो ते दाखवून देईन
- सगळं करूनही तुम्हीं तुरुंगाबाहेर राहिलात याचं कारण बाळासाहेब ठाकरे हे आहेत. नाहीतर कधीच बाहेर राहिला नसतात.
- सुशांतसिंह राजपूतच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि अमित शहाला फोन केले होते. आता त्यांना एकेरी भाषेत बोलतात. आमचे पंतप्रधान जगात नावलौकिक मिळवलेले आहेत. ते सत्तेवर आले तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती, आता ती पाचव्या क्रमांकावर आलीय. हे मोदींनी केलं. उद्धव ठाकरेंकडं सांगण्यासारखं काय काम आहे
- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर बसून राज्याला अधोगतीकडं नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसवाले बोलावतात मिटिंगला. अजित पवार त्यांना बघून डोळे मारतात. उद्धव ठाकरे हे फक्त शिव्या द्यायचं काम करू शकतात, बाकी काही नाही
- आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस बोलणारे उद्धव ठाकरे हे महाफडतूस आहेत. महाराष्ट्राच्या अजिबात कामाचा माणूस नाही
- फुकाच्या धमक्या देतायत. आहे हिंमत तर या मैदानात. मी येतो. मला सुपारी देऊनही उद्धव ठाकरे मारू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे कोण? पत्नी आणि दोन मुलं सोडून यांच्यामागे आहे कोण?
- राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे उद्धव ठाकरे यांना आता केवळ सपोर्टिंग पार्ट म्हणून ठेवतायत. ते पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. विशिष्ट प्रकारची खुर्ची नेतात, कारण यांना बसताही येत नाही. लोकांना वाटतं त्यांना सिंहासन दिलं जातं. पण प्रत्यक्ष गोष्ट वेगळी आहे
- उद्धव ठाकरे हे एकटे चालू शकत नाहीत. म्हणून कुटुंब घेऊन जातात जिकडं-तिकडं
- रोशनी शिंदे या कोणावर बोलतात? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर टीका करतात. काय औकात आहे? माझ्या पक्षात असती तर मी दम दिला असता
- उद्धव ठाकरे हे एक नंबरचे खोटारडे, विक्षिप्त, कार्यशून्य आहेत. मी मातोश्रीवर जायचो तेव्हा हे बोलूनही द्यायचे नाहीत.
- कोरोनाच्या काळात अनेक टेंडर निघाली. त्यात आदित्य ठाकरे यांनी १५ टक्के घेतले
- उद्धव ठाकरे यांनी इतके खोके कमावले. कुणा शिवसैनिकाला मदत केली का?
- उद्धव ठाकरे यांचा घणाघात अशा बातम्या येतायत. उद्धव ठाकरे आणि घणाघात करणार. कुणाच्या साधं कानफाटात मारलीय का?
- बाळासाहेबांचं नाव आणि शरद पवारांच्या मेहेरबानीमुळं मुख्यमंत्री झाले. पंतप्रधानांबद्दल बोलायची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? बाळासाहेबांचा मुलगा एवढं सोडलं तर तुम्हाला काय कळतं? कुठले प्रश्न कळतात
- सचिन वाझेला पोलीस खात्यात पुन्हा कुणी घेतलं होतं. सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला या सगळ्याची उत्तरं माहीत नसलेले उद्धव ठाकरे इतरांवर टीका करतात
- उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजले होते. पण त्यांना त्याचं भानच नाही
- उद्धव ठाकरेंना चांगलं बोलता येतं का हाच प्रश्न आहे.
- मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी डिलिव्हरी करण्याचं काम सुरू केलंय.