आपत्कालीन वापरासाठी ‘2-डीजी’ (DRDO) चे अँटी-कोरोना ड्रग 2DG हे औषध लॉन्च करण्यात आलेआहे. आता हे औषध रुग्णांना देता येणार आहे. लॉन्चच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून सकाळ-संध्याकाळ पाण्यात मिसळून कोरोना रुग्णांना देण्यात येईल. हे औषध प्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल. डीआरडीओ अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की देशभरातील 27 रुग्णालयांमध्ये या औषधाची अंतिम चाचणी घेण्यात आली होती. तेथे उरलेला साठा देखील गोळा करण्यात आला आहे. त साठा आता दिल्ली येथील डीआरडीओ (DRDO) हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात येणार आहे. ही औषधे त्वरित दिल्लीत आणण्याचे काम सुरू आहे.
आपत्कालीन वापरास मान्यता