( देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर निवे मारळ कळकदरा मार्लेश्वर रस्ता हा अनेक वर्ष प्रलंबित होता. हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने होणे अत्यंत महत्वाचा होता. दशक्रोशीतील ग्रामस्थ व मार्लेश्वर येथे येणारे भाविक हा रस्ता होणेबाबत सततची मागणी करत होते.
आमदार शेखर निकम यांनी या मागणीचा विचार करुन तसेच या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आसपासच्या गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या या खराब झालेल्या रस्त्याबाबत येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्याचा तात्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे पाठपुरावा करुन, हिवाळी अधिवेशन 2020-21 बजेट अंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील रा.म.मा. 66 ते तळेकांटे देवरुख मुरादपूर निवे मारळ कळकदरा मार्लेश्वर शाखेसह रस्ता रा.मा. 174 कि. मी. 25/500 ते 31/500 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाला रु. 2 कोटी 40 लाखाचा निधी आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजुर करुन आणला, असे आम. शेखर निकम यांनी सांगितले. तसेच मार्लेश्वर मंदीर पर्यटन विकासाच्या दृष्टीने लागणारा जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी यापुढेही प्रयत्न केला जाईल व यापुढील उर्वरीत रस्ता याला सुद्धा मंजूरी आणून तो पुर्ण केला जाईल असा शब्द त्यांनी दिला.
यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुरेश बने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विवेक शेरे, आरडीसीसी बँक संचालक नेहा माने, राजेंद्र सुर्वे, मंगेश बांडागळे (सरपंच, मुरादपूर), बापू शेट्ये (सरपंच, कोंडगाव), वैष्णवी शिंदे (सरपंच, बामणोली), सोनाली गुरव (सरपंच, निवे), सोनल चव्हाण (सरपंच, बोंडे), मानसी करंबेळे (सरपंच, कासारकोळवण), मंगला गुरव (सरपंच, मारळ), अरुणा अणेराव (सरपंच, आंगवली), सा.बा. विभाग देवरुख पुजा इंगावले, शाखा अभियंता विकास देसाई, व सर्व दशक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.