(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी आणि सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. राधाबाई शेटे सभागृहांमध्ये उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाळासाहेब माने यांनी असे मत व्यक्त केले की, कोकणातील सौंदर्यामुळे चित्रपट निर्मिती रत्नागिरीमध्ये होणे गरजेचे आहे. महोत्सवामुळे चित्रपट निर्मितीतील कोकणातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्मिती करणारे स्थानिक कलाकारांना रोजगार मिळणार असेल तर आपण शासकीय पातळीवरच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासनापर्यंत पाठपुरावा नक्की करू असे आश्वासन दिले.
यावेळी प्रकाश जाधव यांनी आपण स्वतः रत्नागिरीतील असल्यामुळे रत्त्नागिरीमध्ये दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक रत्नागिरीचे निर्माते रत्नागिरीमध्ये येऊन चित्रपट निर्मितीसाठी येऊ शकतात. हाच मुख्य उद्देश ठेऊन अध्यक्ष जेष्ठ अभिनेते विजय पाटकर कार्यवाह श्री विजय राणे यांनी सिंधूरत्न कलावंत मंचची निर्मिती केली आहे. कोकण चित्रपट महोत्सव अनेक मान्यवरांना एकत्र करण्यासाठी आयोजित केला आहे. यावेळी रत्नागिरी फिल्म क्लबचे श्री मुळे यांनी क्लबतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात याची माहिती दिली. प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी सर्वांच्या आभार मानले. डॉ. आनंद आंबेकर रत्नागिरी जिल्हा चित्रपट महोत्सवाचे समन्वयक असल्याने विद्यार्थी, कलाकार, चित्रपट व्यवसायातील मान्यवर आणि स्थानिक प्रतिष्ठित लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण कार्यक्रमासाठी अनेक स्तरावरून सहकार्य मिळत आहे.