(तरवळ / अमित जाधव)
राजापूर तालुक्यातील कोकण मराठी साहित्य परिषद शाखा-राजापूर आयोजित मराठी कवितेचा नजराणा श्रावण काव्यधारा कवीसंमेलन ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात संस्थेचे व कोमसापचे विद्यमान अध्यक्ष श्री. वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार १० सप्टेंबर रोजी पार पडले.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ही महाराष्ट्रातील सांस्कृतीक व शैक्षणिक उपक्रम राबवणारी एकमेव संस्था आहे. श्री. तुळसणकरांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उदगार कोल्हापूर येथील प्रसिद्ध कवी तसेच कविसंमेलनाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कांबळे यांनी काढले. या कविसंमेलनामध्ये राजापूर तालुक्यातील विकास पाटील, रवींद्र नाडगौडा, स्नेहल तुळसणकर, रामचंद्र तुळसणकर, सागर पाटील, स्नेहल चव्हाण, मुग्धा कुळये, मानसी सुर्वे, उदयकुमार नाईक, अशरफ मुकरी, आशिष सावंत, सौ. जठार यांनी विविध विषयावर आपल्या कविता सादर केल्या.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री तुळसणकर यांनी यावेळी सांगितले की, राजापूर तालुक्यातील नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा काव्य लेखनासाठी प्रवृत्त केले पाहिजे, कवींनी सुद्धा आपल्या कवितांमध्ये नाविन्य आणले पाहिजे असे उपस्थित नवोदित कवी व श्रोत्यांना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, प्रदीप संसारे, अरविंद गोसावी, गणपत जानस्कर, गणपत भारती, विजयकुमार वागळे एकनाथ मोंडे, सूर्यकांत सुतार व शैलेश शिंदे -देसाई आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे व कवींचे स्वागत मुख्याध्यापक श्री. तानाजी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे निवेदन श्री. संदीप देशपांडे यांनी केले तसेच आभार श्री. मिरगुले यांनी मांडले.