(रत्नागिरी)
कोकणातील पर्यटनाला चालना देणाऱ्या सागरी महामर्गाला अखेर शासनाने मंजूरी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत हा सागरी महामार्ग होणार आहे.सात टप्प्यात होणाऱ्या महामर्गाला १० हजार कोटींची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे याचवर्षी महामार्गास मान्यता देऊन रस्ताच्या काम विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. सुमारे ४९८ किमीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी १० हजार कोटींचा खर्च प्रस्थापित आहे. १६ मार्च रोजी अंतिम मान्यता मिळाली असून तो चार पॅकेजमध्ये बांधण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे हा महामार्ग समुद्र किनाऱ्याजवळून जाणार आहे. यामुळे याचा फायदा येथील पर्यटनास होणार आहे. या महामार्गामुळे कोकणाचा अधिक विकास देखील होणार आहे. कोकणातील प्रसिध्द आंबे, काजू, नारळ, सुपारी यांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. यामुळेच हा होणारा महामार्ग कोकणवायींसाठी फक्त महामार्ग नसून सोन्याचा रस्ताच ठरणार आहे. विशेष म्हणजे रेवस ते रेड्डी मार्गावरील केळसी खाडीवरील पुलासाठी १४८ कोटी जवळपास खर्च मंजूर करण्यात आला आहे.
महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. मात्र, मुंबईकरांना गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. हे आहेत महामार्गाचे टप्पे, द्रोणागिरी ते मुरूड ८० किलो मीटर, मुरूड ते बाणकोट ६४ किलो मीटर, बाणकोट ते रत्नागिरी १४६ किलो मीटर, रत्नागिरी ते पावस २० किलो मीटर, पावस ते खाक्षीतिठा ६९ किलो मीटर, खाक्षीतिठा ते मालवण ५० किलो मीटर, मालवण ते गोवा ६५ किलो मीटर असणार आहेत. यादरम्यान महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास दहा हजार कोंटीचा खर्च येणार आहे.