(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये लावगणवाडी येथील गणेश मंदिरात २४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ या तीन दिवसाच्या कालावधीत माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी आरती,भोवत्या, ह.भ.प. विश्वनाथ दाबके रत्नागिरी यांचे कीर्तन, लावगणवाडी ग्रामस्थांचे नमन. बुधवारी २५ जानेवारीला सकाळी अभिषेक- सहस्रावर्तने आरती, ह.भ.प. विश्वनाथ दाबके रत्नागिरी यांचे गणेश जन्माचे किर्तन, गुरुवारी २६ जानेवारीला सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, हळदीकूंकू समारंभ रात्री श्री महालक्ष्मी, रवळनाथ सोमिया सोंबा रिमिक्स नमन मंडळ करबुडे यांचे एकच भगवा ( भवनीनय गण, नटखट गौळण, श्रीकृष्णलिला आणि पेंद्या सुदामा बोबड्याची आगळीवेगळी धमाल काॅमेडी आणि दशमुखी रावण) अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय मुळ्ये व समस्त मुळ्ये परिवार, कोंड्ये लावगणवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ यांनी केले आहे.