(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कोंडगावमधील मुरलीधर आळी येथे गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला दारू विक्री करणाऱ्याविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मंगळवारी (दिनांक 30 ऑगस्ट 2013) करण्यात आली.
नरेंद्र राजाराम चव्हाण (वय 48 रा. कोडगाव, ता.संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस प्रमाप माणिक ठाकरे यांनी तक्रारी दिली. त्यानुसार संशयित आपल्या राहत्या घराच्या समोरील गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विक्री करताना पोलिसांना सापडला. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयीताविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 56 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे