मुंबईतील पश्चिम उपनगरातील एका प्रतिष्ठित कॉलेजचे ऑनलाइन लेक्चर सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. ६० ते ६५ विद्यार्थी हे लेक्चरमध्ये असतांना नेमका व्हिडीओ कोणी टाकला याचा शोध आता पोलीस घेत आहे. जुहू पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हॅकर विरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.
विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी असलेल्या एका प्रतिष्ठित कॉलेजचे ऑनलाइन वर्ग भरले होते, या ऑनलाइन वर्गात सुमारे ६० ते ६५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ऑनलाइन लेक्चरला उपस्थित होती. महत्वाचा विषय असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी शिक्षक सांगत होते ते प्रत्येक जण स्क्रीन वर बघून ऐकत अचानक स्क्रीनवरपॉर्न व्हिडीओ सुरू झाला, अचानक स्क्रीनवर आलेल्या पॉर्न व्हिडीओ मुळे एकच गोंधळ उडाला.अनेकांनी ताबडतोब आपली स्क्रीन बंद करून ऑडिओमार्फत हे काय चाललंय म्हणून अनेकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
या पॉर्न व्हिडीओची दखल कॉलेज प्रशासनाने घेऊन जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जुहू पोलिसांनी प्रथम अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मात्र हा प्रकार विद्यार्थी अथवा शिक्षक यापैकी कोणीही केला नसल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
हा सायबर हॅकरचा प्रकार असून सायबर हॅकरने कॉलेजचा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक करून कॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडिओ टाकला असल्याची शक्यता जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली आहे. या प्रकरणी सायबर सेल पोलिसांची मदत घेऊन या हॅकरचा शोध घेण्यात येत असल्याचे माने यांनी सांगितले.