( रत्नागिरी )
10 फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ओबीसींचे नेते शामराव पेजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविषयी ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजीव किर यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसानी अवमान केल्याचा आरोप केला होता. यावर आता पोलिसानी स्पष्टीकरण दिले आहे.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, रत्नागिरीत मोर्चा संबंधी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये लोकनेते कै. शामराव पेजे यांचे नाव हे टायपिंगच्या मिस्टेकमुळे आले आहे. रत्नागिरी पोलिसांच्या एफआयआर व स्टेशन डायरीत श्रीमती गानू व लोकनेते कै. शामराव पेजे महाविद्यालयातील शिक्षक असा उल्लेख 97 नंबरवर आहे. त्यामुळे टायपिंग करताना महाविद्यालयातील शिक्षक हे राहून गेले. त्यामुळे या चुकीतून गैरसमज निर्माण करू नयेत. सोमवारी या संदर्भात न्यायालयापुढे देखील ही बाब ठेवण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.