(रत्नागिरी)
शहरानजीकच्या केळ्ये पवारवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मंगळवार १८ जुलै रोजी दुपारी १.१० वा. करण्यात आली. या कारवाईत आदित्य अनंत नाखरेकर (३३, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ग्रामीण पोलिस गस्त घालत असताना त्यांना केळ्ये पवारवाडी येथे संशयित आपल्या ताब्यात ९५० रुपयांची १८ लिटर दारू विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.