(चिपळूण /ओंकार रेळेकर)
मुचरी येथील श्री.केदारलींग क्रीडा मंडळाच्या वतीने दि. २६ ते २८ एप्रिल रोजी आयोजित कब्बडी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. संपूर्ण मुचरी गाव पंचक्रोशी मधील ग्रामस्थ मंडळींनी मोठ्या एकोप्याने या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडामहोत्सवात सहभाग घेतला स्पर्धेच्या निमित्ताने गावच्या एकीचे दर्शन झाले.
श्री केदारलिंग क्रीडा मंडळ मुचरी यांच्यावतीने श्री केदारलिंग क्रीडा महोत्सव २०२३ चे दिनांक २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये पंचक्रोशी व निमंत्रित भव्य कबड्डी स्पर्धेचे ग्रामपंचायत मुचरी शेजारील पटांगणात येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत निनावी कब्बडी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला या संघाला संजय भाताडे यांनी प्रायोजित केलेल्या ९०२३ रू.रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तुकाराम गुरव यांनी स्पर्धा करीता द्वितीय क्रमांकाचे ७०२३ रू. दत्ताराम गुरव यांनी तृतीय क्रमांकाचे ५०२३ रू.आणि ओंकार पद्याळ यांच्या वतीने शिस्तबद्ध खेळणाऱ्या संघाला चषक आणि ३०२३ रू. बक्षीस देऊन सन्मानित केले.
सर्व विजयी संघाला प्रताप देसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. भरघोस स्वरूपाची देणगी देऊन मुचरी ग्रामस्थांनी केदारलिंग मंडळाच्या क्रीडा महोत्सवाला प्रोत्साहन दिले. गावच्या प्रत्येक तरुणाने सर्व क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन आपल्या मुचरी गावचे नाव सन्मानाने उंचावले पाहिजे. मुचरी गावच्या विकास कामात असो किंवा सामाजिक सर्व कामात आपले या पुढे
सर्वोतोपरी सहकार्य राहील असे उद्योजक चंद्रकांत भोजने यांनी सांगितले.गावातील बारापाच मानकरी मंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व ग्रामस्थ यांनी क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
फोटो : कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या संघाला सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन सन्मानित करतांना प्रताप देसाई आणि मंडळाचे कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)