(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा हा केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनेंतर्गत येणाऱ्या 13 योजनांमध्ये अग्रेसर आहे. या योजनांची प्रभावी अमलबजावणी केली तर जिल्हा प्रथम क्रमांकावर येईल असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. जिल्हयातील या योजनांसंदर्भातील कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री श्री.सामंत यांनी जिल्हाधिकारी सभागृह येथे केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजना तसेच जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदि संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना,महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, स्वामिनी योजना, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, स्वच्छ भारत अभियान आदि योजनांचा आढावा घेतला.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलकरिता नवीन कुस्ती मॅट खरेदी, व्यायामशाळेसाठी नवीन अद्यावत व्यायाम साहित्य खरेदी, व्यायामशाळा भाडेतत्वावर चालविण्यास देणे आदि विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.