(रत्नागिरी)
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम आयोजित करण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी विविध नियोजित कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी कार्यालयामार्फत २९ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी येथे प्रगतशील शेतकरी संवाद दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण बाबी राबविणारे रिसोर्से फार्मर्स, विविध कृषि पुरस्कार विजेते शेतकरी, भात पिक स्पर्धा मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.